यवतमाळ जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ र. नं. १०९

-: पुरवार्ध :-

            यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना व शिक्षकांना सन १९६० ते १९७० या दशकात मिळणार्‍या वेतनात संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण, शिक्षण, औशोधोपचार इत्यादी खर्च पूर्ण होत नव्हते त्यामुळे सावकारा कडून कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अपरिहार्य होते. खाजगी सावकारकडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करिता कर्ज काढू नये या करिता यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारांची व शिक्षकांची पत संस्था असावी या हेतूने श्री विश्वनाथ बारले यांनी दी. २४ डिसेंबर १९६४ ला यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्थेची मुहूर्तमेढ रोहली .
            श्री विश्वनाथ बारले यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व श्री ए. झेड निशाने हे संस्थापक सचिव म्हणून आपल्या पाच सहकर्‍यांच्या मदतीने संथेची नियमावली मंजूर करून पत संस्थेच्या कार्यास सुरवात करत संस्थेच्या सभासदांना आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्या करिता सुरवातीला नियमित कर्ज रु. २००० व आकस्मिक कर्ज रु. २०० या प्रमाणे कर्ज वाटपास सुरवात केली. ही अल्पशी कर्जाची रक्कमही या काळात संस्थेच्या सभासदांना मदतीचा हात देऊन जात होती. हळू हळू संस्थेचा विस्तार वाढतच गेला श्री विश्वनाथ बारले यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार वटवृक्षात झाला. संस्थेस १९६८ ला व्यवस्थापक म्हणून विधितज्ञ श्री पुरुषोत्तम काकडे कार्यकरीत होते. त्या नंतर संस्थेणी कधीच मागे वळून पहिले नाही. संस्थेची वाटचाल उत्तरौत्तर प्रगतिची राहिली. रु. २००० कर्ज मर्यादा ही रु. १२००००० झाली. संपर्क: सचिव श्री आर. आर. पिंपळशेंडे, भ्रमणध्वनी: ९४२१७७३१४६
           सन १९९५ पासून संस्थेच्या नेतृत्वाची धुरा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री राजुदासजी जाधव यांचे कडे आली, त्यांनी संस्थेचा विस्तार व विकासाला प्राधान्य देत पुसद व वणी येथे संस्थेच्या शाखा उघडून संस्थेचे संपूर्ण कामकाज संगनिकृत करण्यास प्राधान्य दिले. श्री राजुदासजी जाधव यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत संस्था सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.