रिक्त पदांची जाहिरात

संस्थेकडून खालील प्रमाणे रिक्त जागा भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. १२.०३.२०२६ पर्यंत संस्थेकडे वेळेत पोहोचतील असे पाठवावे. सदर तारखे नंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

अ.क्र.
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक
१) कोणत्याही शाखेचा पदवीधर व सहकारी बँकेत अथवा पतसंस्थेत ५ वर्षाचा व्यवस्थापक/पर्यवेक्षकिय अथवा समकक्ष पदावर काम केल्याचा अनुभव.
२) जीडीसी अँड ए/एच डीसीएम असल्यास प्राधान्य.
३) एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण.
४) वयोमर्यादा: शासकीय नियमाप्रमाणे.
५) परीविक्षाधीन कालावधी एक वर्ष, मानधन रु. १०,०००/- दरमहा.
शाखा व्यवस्थापक
१) कोणत्याही शाखेचा पदवीधर व सहकारी बँकेत अथवा पतसंस्थेत ५ वर्षाचा व्यवस्थापक/पर्यवेक्षकिय अथवा समकक्ष पदावर काम केल्याचा अनुभव.
२) जीडीसी अँड ए/एच डीसीएम असल्यास प्राधान्य.
३) एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण.
४) वयोमर्यादा: शासकीय नियमाप्रमाणे.
५) परीविक्षाधीन कालावधी एक वर्ष, मानधन रु. १०,०००/- दरमहा.
कनिष्ठ सहाय्यक
१) एच.एस.सी. उत्तीर्ण.
२) जीडीसी अँड ए असल्यास प्राधान्य.
३) एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण.
४) वयोमर्यादा: शासकीय नियमाप्रमाणे.
५) परीविक्षाधीन कालावधी एक वर्ष, मानधन रु. ८,०००/- दरमहा.
परिचर
१) एस.एस.सी. उत्तीर्ण.
२) वयोमर्यादा: शासकीय नियमाप्रमाणे.
३) परीविक्षाधीन कालावधी एक वर्ष, मानधन रु. ६,०००/- दरमहा.

अटी व शर्ती

  1. उमेदवारांने आपल्या स्वतः हस्ताक्षरात व सुस्पष्ट अर्ज लिहावा.
  2. अर्जावर ज्या पदाकरिता अर्ज करीत आहे ते स्पष्ट नमूद करावे.
  3. पत्रव्यवहाराचा पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक नमूद करणे अनिवार्य.
  4. अर्जासोबत रु. १०००/- डीडी "सचिव, यवतमाळ जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. र. नं. १०९ यवतमाळ" या नावाने जोडावा. डी.डी. नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. शैक्षणिक पात्रतेच्या प्रती स्वसाक्षांकीत केलेल्या असाव्या.
  6. रिक्त पद भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अंतिम अधिकार संस्थेस राहील.
  7. निवड झालेल्या उमेदवाराला शाळा सोडल्याचा मूळ प्रमाणपत्रासह सर्व शैक्षणिक पात्रतेच्या मूळप्रती सादर करणे अनिवार्य राहील.
  8. परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर नियुक्ती नियमित करण्याचा अंतिम अधिकार संचालक मंडळास राहील.