सूचना :-
कर्जदार सभासदांनी कर्ज घेतेवेळी रुपये १०० चे स्टॅम्पवर सेतुमधून प्रमाणित प्रतिज्ञालेख करून देणे, मुद्रांक शुल्क अधींनियमानुसार बंधनकारक आहे.
सर्व सभासदांनी कर्जाचे हफ्ते मागणी प्रमाणे दरमहा वेतनातून कपात करून द्यावी व दंडनीय व्याजचा भुर्दंड टाळावा .
सतत ३ हफ्ते थकविल्यास कर्ज खाते एनपीए होते याची कृपया जाणीव ठेवावी . ९७ व्या घटना दुरूस्ती व कायद्यातील तरतुदींनुसार सतत ३ हफ्ते मुद्दल रक्कम जमा न झाल्यास सदर थकीतदार सभासदचे मतदार यादीत नाव येत नाही याची नोंद घ्यावी.
सभासदांनी खात्यांचा खाते उतारा मागणी केल्यास देण्यात येईल.
वेतनातून कपात न झाल्यास थकीत हपत्यांची रक्कम संस्थेत नगदी भरून पावती घ्यावी.
संस्था आपली आहे ही बाब विचारात घेऊन संस्थेचे ठेवी वाढीसाठी आपण आपल्या नातेवाईकास आपल्या मित्रपरिवारास संस्थेत ठेवी गुंतविण्यास सांगावे.
कर्ज मिळण्यातील विलंब टाळण्यासाठी कर्ज मागणी अर्जातिल संपूर्ण माहिती अचूक भरावी. तसेच त्या सोबत आवशक त्या संस्थेचे नादेय प्रमाणपत्र जोडावे तसेच कर्ज जामीनदार हा साखळीतीलच असावा .
कर्ज मागणी अर्ज जामीनदाराच्या माहिती व सहिणीशी पूर्ण भरून खाते प्रमुखाचे सहीसह सादर करावा व अर्जावर फोटो लावण्यात यावा .
आपल्या अडीअडचणीसाठी आम्ही व संस्थेचे कर्मचारी वर्ग सदैव तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध आहो .
आपण जामीनदार असलेल्या व्यक्तीचे कर्ज हफ्ते नियमित भरण्यात येत आहेत किवा नाही याची काळजी घ्यावी. सादर कर्जदाराईतकीच जामीनदार म्हणून आपलीही कायदेशीर जबाबदारी आहे, याची जाणीव असावी.
९७ व्या घटना दुरूस्ती नुसार संस्थेच्या क्रियाशील सभासदास ५ सर्वसाधारण सभेपैकी एका सभेस हजर राहणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम ४५ व कलम ४९ चे पालन करावे.